Thursday, 12 October 2017

     माती परीक्षण dbrt
माती परीक्षण का करतात ?

शेतीतून जादा उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र यामुळे शेतीच आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. शेतीच हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आपल्या शेतीतल्या मातीच आणि पाण्याचं परीक्षण करणं हिताच ठरतं.
जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास त्यावर योग्य उपाय शोधणं, पिकांना दिली जाणारी खते प्रमाणशीर न दिल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होत नाही.तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्याने अनावश्यक खर्च वाढतो. मातीपरीक्षण केल्यामुळे आपल्या शेतीची अन्नद्रव्याची नेमकी गरज शेतकऱ्याला लक्षात येऊ शकते.त्यामुळे खतांच्या वापरात आणि खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादनही वाढू शकते.माती परीक्षण हे आपल्या जमिनीमध्ये कोण कोणते घटक आहेत ते पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते .
माती परीक्षणासाठी मातीचा  नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये .
  1. बांधाच्या कडेचा.
  2. शेतामध्ये टाकलेल्या खताच्या ढिगाऱ्या खालची घेऊ नये .
  3. जमिनीची माश्यागत करण्याच्या नंतर घेऊ नये .
  4. एकच ठिकाणची माती घेऊ नये.
  5. एकाच सरळ रेषेत नमुना घेऊ नये .
  6. नमुना पिक काढल्या नंतर घ्यावा.


माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा.
मातीचा नमुना घेताना झिग-झ्याग पद्धतीने घ्यावी. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. मातीचा नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4  समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा 4  समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी. वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि खालील माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकावा -
1. नमुना क्रमांक
2. नमुना घेतल्याची तारीख
3. शेतक-याचे संपूर्ण नाव
4. गाव आणि पोस्ट
5. तालुका
6. जिल्हा
7. सर्व्हे किंवा गट क्रमांक
8. नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र
9. बागायत किंवा जिरायत
10. मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात
11. पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात
12. मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये)
13. जमिनीचा उतार किंवा सपाट
14. जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर
15. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट
16. माती नमुना गोळा करणा-याची सही.
एवढे झाल्या नंतर माती परीक्षण केंद्राकडे पाठवणे.

No comments:

Post a Comment